• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

रेल्वे स्टेशन रोड येथे श्री दत्त मंदिर जिर्णोद्धार सोहळा

ByMirror

Nov 28, 2025
रविवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन

रविवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन


आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार महाआरती

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन रोड आनंदनगर परिसरातील दत्त कॉलनी येथे असलेल्या दत्त मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त ‘श्रीदत्त व आनंदेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा’ या धार्मिक सोहळ्याचे आयोजन आनंदनगर, दत्त कॉलनी व परिसरातील रहिवासी तसेच मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


रविवार दि.30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी व धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करून भंडाऱ्याचे वितरण करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी पुजन शांति, पाठस्थापित देवता हवन, प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहुती यज्ञ होणार आहे. या धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर धार्मिक वातावरणाने भारलेला राहणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *