• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूरमध्ये रंगली प्रभात फेरी

ByMirror

Nov 5, 2025
आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत

गुरुनानकांच्या जयघोषाने दुमदुमले परिसर; भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात


आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोले सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरात गुरुनानक देवजी यांची 556 वी जयंती म्हणजेच गुरुपुरब उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी (दि.5 नोव्हेंबर) सकाळी तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथून शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने पारंपारिक वाद्यासह प्रभातफेरी काढण्यात आली होती. यामध्ये समाजबांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरुनानक देवजी यांचा जयघोष केला.


तारकपूर परिसरातून निघालेल्या या प्रभातफेरीचे टॉपअप पेट्रोल पंम्प येथे जनक आहुजा परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. फेरीमध्ये वाहनावर असलेल्या गुरुनानक देवजी यांची प्रतिमा व धार्मिक पोथीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सामुदायिक अरदास (प्रार्थना) करुन सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना केली.


याप्रसंगी जनक आहुजा, इंद्रजीत नय्यर, हरजीतसिंग वधवा, राजेंद्र कंत्रोड, प्रीतपालसिंग धुप्पड, गुलशन कंत्रोड, राजीव बिंद्रा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, अभिमन्यू नय्यर, ब्रिजमोहन कंत्रोड, अमित खामकर, बबलू आहुजा, कैलाश नवलानी, जितू गंभीर, अमित खामकर, सोमनाथ जाधव, निप्पू धुप्पड, राजू जग्गी, सुनील थोरात, अनमोल रामानी, किशोर कंत्रोड, अनिल शर्मा, संजय आहुजा, जशपाल पंजाबी, रिकी कंत्रोड, दिनेश कंत्रोड, मनमोहन चोपडा, सतीश गंभीर आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


गुरुनानक जयंतीनिमित्त मागील सात दिवसापासून शहरातील व तारकपूर येथील गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तन दरबार, प्रवचन, अखंडपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमासह लंगरचा भाविकांनी लाभ घेतला. रागी जथ्था भाई अम्रितसिंगजी (इंदोरवाले) यांनी किर्तन सादर केले. तर प्रवचनाच्या माध्यमातून गुरूनानक देवजी यांचे संदेश व विचार समाज बांधवांना सांगण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *