• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

रविवारी निमगाव वाघात रंगणार नवदुर्गा सन्मान सोहळा

ByMirror

Sep 28, 2025
महिला मेळाव्यात आरोग्य विषयी मार्गदर्शन

विविध क्षेत्रातील 9 कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव


महिला मेळाव्यात आरोग्य विषयी मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील 9 कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी महिला मेळावा होणार असून, पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


परिवार मंगल कार्यालयात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी भरोस सेलच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे, कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात व पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.


सरपंच उज्वला कापसे (सामाजिक व राजकीय क्षेत्र), नगर पंचायत समितीचे कृषी व्यवस्थापक रोहिणी आगरकर (कृषी), सरोज आल्हाट (कवियत्री व साहित्यिक), डॉ. सौ. अस्मिता खिस्ती (वैद्यकिय), मुख्याध्यापिका संगीता फुलसौंदर (शिक्षण), सहकार क्षेत्रात वैशाली वर्पे (सहकार), महसूल सेवक सुनीता जाधव (शासकीय), सोनाली फलके (बचत गट), देवकी ढोकणे (शैक्षणिक), मंगल ठाणगे (बचत गट), पूर्वा ख्रिस्ती (शैक्षणिक) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


या कार्यक्रमात निंबळकचे प्रभाग समन्वयक संदीप वाबळे, एसबीएम विभागाचे संदीप तागडकर व आरोग्यावर डॉ. धनश्री ढुमणे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, डोंगरे संस्थेचे सचिव मंदाताई डोंगरे परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *