• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

उपधर्मादाय आयुक्त एन. व्ही. जगताप यांची एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानला भेट

ByMirror

Oct 1, 2025
देवीचे दर्शन घेऊन आरती; देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार

देवीचे दर्शन घेऊन आरती; देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार


भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टने घेतलेली काळजी कौतुकास्पद -जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे उपधर्मादाय आयुक्त एन.व्ही. जगताप व ॲड. राजेंद्र वाबळे यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


प्रारंभी उपधर्मादाय आयुक्त जगताप यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, तसेच विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते.


उपधर्मादाय आयुक्त एन.व्ही. जगताप म्हणाले की, श्री रेणुका माता मंदिर हे एमआयडीसी पंचक्रोशीतील श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे येऊन देवीचे दर्शन घेणे ही मोठी आध्यात्मिक अनुभूती आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढते, त्यावेळी व्यवस्थापनाची जबाबदारी महत्त्वाची ठरते. देवस्थान ट्रस्टने केलेली तयारी आणि भाविकांच्या सोयीसाठी घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला असून, शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *