• Wed. Nov 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

मराठी राजभाषा कृती समितीच्या शेवगाव पश्चिम विभागाच्या कार्याध्यक्षपदी वृषाली मुरदारे यांची निवड

ByMirror

Nov 11, 2026
नियुक्तीपत्र देऊन सत्कार

नियुक्तीपत्र देऊन सत्कार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या मराठी राजभाषा कृती समितीच्या शेवगाव पश्चिम विभागाच्या कार्याध्यक्षपदी कन्या विद्यालय, निंबोडी (फाटा) येथील शिक्षिका श्रीमती वृषाली वसंत मुरदारे यांची निवड करण्यात आली आहे.


श्रीमती वृषाली मुरदारे या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून मराठी भाषा व साहित्याविषयी त्यांना विशेष आवड आहे. त्यांना हा वारसा त्यांचे वडील ज्येष्ठ साहित्यिक शेवगाव तालुक्याचे भूषण वसंतराव भाऊराव मुरदारे यांच्याकडून वडिलोपार्जित असल्याने त्यांना मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याविषयी विशेष आवड आहे, त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


या निवडीबद्दल हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माननीय आमदार प्रसाद लाड, संस्थेचे सचिव कुशल भापसे, सौ. चैतालीताई भापसे तसेच गणेश कोठुळे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव तांदळे यांच्यासह भापसे सर, पठाण सर, साळवे सर, मरकड सर, घोडके सर, म्हस्के सर, बुधवंत सर, चोथे सर, पाचरणे सर, पाठक मॅडम, मरकड मॅडम, आहेर मॅडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.


या निवडीमुळे शेवगाव पश्चिम विभागात मराठी भाषा संवर्धन, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक, अमोल क्षीरसागर, व संस्थेचे अध्यक्षा सौ. सुलोचना क्षीरसागर यांनी नियुक्तीपत्र देऊन व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *