• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

मोहित बारगळ याची एमपीएससीतून क्लास वन अधिकारी पदी निवड

ByMirror

May 14, 2025
अभियांत्रिकी विभागात मिळवला 111 वा क्रमांक

अभियांत्रिकी विभागात मिळवला 111 वा क्रमांक

नगर (प्रतिनिधी)- येथील मोहित अजयकुमार बारगळ याची एमपीएससी परीक्षेतून क्लास वन अधिकारी पदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत अभियांत्रिकी विभागात त्याने 111 वा क्रमांक मिळवला आहे.


मोहित बारगळ पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील असून, त्याने स्ट्रक्चर मधून पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे. त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज वीळद घाट येथून पूर्ण झाले आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेला मोहित याने उच्च स्वप्न ठेवून छोटे-छोटे उद्दिष्ट पार करत क्लास वन अधिकारी होण्याचे यश मिळवले आहे. सध्या तो जलसंपदा उपविभाग उरळीकांचन या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत आहे.


मोहित हा रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य अजयकुमार बारगळ यांचा मुलगा आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *