• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

भुतकरवाडीत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

ByMirror

Jul 15, 2024
भुतकरवाडीत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्‍वर माऊली, तुकाराम महाराज व विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.


पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन आपल्या पालकांसह दिंडीत सहभागी झाल्या होत्या. ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने परिसर निनादला.


भुतकरवाडी परिसरात या दिंडीचे संचलन झाले. या चिमुकल्यांची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. महादेव मंदिराच्या परिसरात दिंडीची सांगता झाली. शालेय संचालिका स्वाती डोमकावळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची दिंडी रंगली होती. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्या राजहंस, सविता सब्बन, धनश्री काळे, प्रांजली जोशी आदींसह पालकांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *