• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिळाली नवदृष्टी

ByMirror

Feb 18, 2025
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिळाली नवदृष्टी

नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष

फिनिक्सच्या शिबिराद्वारे 43 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी

नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून 43 ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली. पुणे येथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होवून ज्येष्ठ नागरिक शिवजयंतीच्या पूर्व संध्येला शहरात परतले.
शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांचा एकच जय घोष करण्यात आला. फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. आगळ्या-वेगळ्या पध्दतीने दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेने त्यांना नवदृष्टी देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.


आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यात फिनिक्स फाऊंडेशनने मोठी चळवळ उभी केली आहे. दरवर्षी शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर फिनिक्सच्या माध्यमातून शिबिर घेऊन गरजूंवर पुणे येथील के.के. आय बुधराणी मध्ये मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी हे शिबिर आधार ठरत असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबीराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाची देखील जनजागृती सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *