• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना

ByMirror

Feb 19, 2025
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना

मराठा समन्वय परिषद व जिजाऊ ब्रिगेडचा संयुक्त उपक्रम;

महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष

नगर (प्रतिनिधी)- रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.18 फेब्रुवारी) संध्याकाळी मराठा समन्वय परिषद व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला. लखलखत्या पणत्यांचा झगमगाटात शिवाजी महाराजांचा जयजयकार करुन शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आले. तसेच पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले यांच्या माळीवाडा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिला शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांना दीपोत्सवाने मानवंदना दिली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाईची देखील सजावट करण्यात आली होती. तर यावेळी महिलांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला. याप्रसंगी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, अलकाताई मुंदडा, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा स्वाती जाधव, ॲड. अनुराधा येवले, लतिका पवार, राजश्री शितोळे, रेश्‍मा आठरे, आशा निंबाळकर, आशा गायकवाड, नीलिमा पवार, सुनिता काळे, अरुणा गोयल, जयश्री पुरोहित, जीवनलाचा पोखरणा, नंदा पुरोहित, सुरेखा कडूस, रेणुका दौंड, वंदना इथापे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


दरवर्षी महिला शिवजयंतीच्या पूर्व संध्येला एकत्र येऊन हा दीपोत्सव साजरा करत असतात. ज्या राजाने आपल्या स्वराज्यातून रयतेच्या जीवनात प्रकाश निर्माण केला व एक आदर्श राज्य निर्माण केले. त्यांना मानवंदना देण्यासाठीचा हा उपक्रम असल्याची भावना अनिता काळे यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *