• Sun. Apr 19th, 2026

भाऊसाहेब फिरोदियामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

ByMirror

Apr 19, 2026

तसेच विद्यार्थ्यांचे केले जाणार समूपदेशन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी दिली.


ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गतवर्षीपासून पूर्णपणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात झालेली आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला आणि पालकांना आर्थिक झळ बसली होती.


यामुळेच या वेळेला शासनाकडून ही प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आलेली आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये अनंत अडचणी येतात त्यांच्याकडून चुका होतात, आणि चुकीचे फॉर्म भरल्यामुळे पुढे प्रवेशासही अडचण निर्माण होते. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी संस्थेच्यावतीने पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सेवा तसेच मोफत समूपदेशन उपलब्ध करून देण्यात आलेले असल्याची माहिती प्राचार्य उल्हास दुगड यांनी दिली.


या ऑनलाइन प्रवेशामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांचा भाग 1 भरावयाचा असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी 9325109829 व 9096244178 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *