तब्बल 89 विद्यार्थी गुणवत्ता यादीत; राज्य गुणवत्ता यादीतही 27 विद्यार्थी चमकले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने ‘लक्ष्यवेध’ राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली. शाळेतील तब्बल 89 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. यामध्ये 27 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर 43 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आणि 19 विद्यार्थी केंद्र गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करुन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डॉ. निक्रड, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, पालक संघाचे सदस्य कैलास गुंजाळ तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात ज्ञानदेव पांडुळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना शिस्त, सातत्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे स्पष्ट केले. गुणवंत विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहकले, रुपाली वाबळे, सौ. अनभुले, जयश्री खांदोडे, इंदुमती दरेकर, कांचन मदने, पूनम धाडगे, रूपाली पांडुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, तसेच लाइफ मेंबर सदस्य शिवाजी लंके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
–
‘लक्ष्यवेध’ राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवंत पुढीलप्रमाणे;-
इयत्ता पहिली: ओजस्वी भोरे (राज्यात तिसरी), जेसीएल कसोटे (तिसरा), शुभ्रा साळुंखे (चौथी), अद्विका शिर्के (पाचवी), संयुक्ता लटपटे (पाचवी), शौर्य कांडेकर (पाचवा), वेद खराडे (पाचवा), आर्वी चौरे (पाचवी), चिरायू जाधव (सहावा), मेहुल दारकुंडे (सहावा), अपूर्व बडवे (सातवा), संस्कृती वायकर (सातवी), श्राव्या बडवे (सातवी)
इयत्ता दुसरी: कैवल्य गारुडकर (पाचवा), सानवी कोहक (पाचवी), ज्ञानश्री नवले (सहावी), स्वर्णिम मोकाटे (सातवा)
इयत्ता तिसरी: रुद्र गुंजाळ (दुसरा), अद्वित खेडकर (सहावा), श्रीराज गुंजाळ (सहावा)
इयत्ता चौथी: आरोही सोनवणे (दुसरी), आयुष सोनमाळी (दुसरा), सरफराज शेख (चौथा), स्वरा दरेकर (चौथा), अनुष्का धामणे (पाचवा), पार्थ जाधव (पाचवा), वेदांत राहिंज (सातवा)
