विद्यार्थी भारावले साहित्य व काव्य विश्वाने
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठीचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे माजी विद्यार्थी संघाचे संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून “साहित्यिक आपल्या भेटीला” हा उपक्रम राबविण्यात आला. जवाहर माध्यमिक विद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या या उपक्रमा अंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांचे व्याख्यान व काव्य वाचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कवि सोनवणे यांच्या “जीवनाची वारी” या कवितेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी शब्दगंध साहित्य परिषदचे प्रा. डॉ. किशोर धनवटे व प्रा.डॉ.दिगंबर सोनवणे यांच्या माध्यमातून फिरते वाचनालय उपक्रम अंतर्गत”शब्दगंध सामूहिक पुस्तक वाचन उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य प्रकारातील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. किशोर धनवटे यांनी पुस्तकांशी मैत्री करा असा संदेश दिला. माजी विद्यार्थी संघाचे संतोष कानडे यांनी उपक्रम आयोजनामागचा हेतू सांगताना स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी. यासाठी साहित्यिक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विविध सण उत्सव सत्कार समारंभ, वाढदिवसाच्या निमित्ताने इतर भेटवस्तू ऐवजी पुस्तके भेट द्यावी ही संकल्पना कानडे यांनी मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. विनोद गुंदेचा होते. यावेळी व्यासपीठावर संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ.दीपकजी शिंदे व नानासाहेब पाटील अंबाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष किरण जावळे, माजी उपाध्यक्ष बाबासाहेब जावळे, शालेय समिती सदस्य प्रा. अशोक चौधरी, प्राचार्य अंशुमन वाकचौरे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर, प्रा. दिलीप ससे, प्रा. भगवान भाबड, प्रा. भाऊसाहेब पानसरे, प्रा. संदिप बुचकुल, संदीप शेंडगे, एकनाथ आव्हाड, ग्रंथपाल घुगरकर, यांसह सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती स्वाती दळवी, रुख्मिणी सोनवणे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. कृष्णा शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा. भाऊसाहेब तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

