• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

ByMirror

Nov 26, 2024
संविधान एका समाजापुरते नसून, सर्व भारतीयांचा -सुनिल सकट

संविधान दिन चिरायु होवो… च्या घोषणा

संविधान एका समाजापुरते नसून, सर्व भारतीयांचा -सुनिल सकट

नगर (प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्केटयार्ड समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष भैय्या पठाण, अशोक खंडागळे, विशाल भिगारदिवे, सुबोध वाघचौरे, पोपट जाधव, रशिद शेख, विशेष कुमार, संजय जगताप, बाळासाहेब घोरपडे, अशोक भोसले, प्रकाश साळवे आदी उपस्थित होते.
संविधान दिन चिरायु होवो…. भारतीय संविधानाचा विजय असो… च्या यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सुनिल सकट म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली आहे. राजेशाही संपवून सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली व संविधान एका समाजापुरते नसून, सर्व भारतीयांचे आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्र्यता प्रस्थापित झाली असल्याची भावना व्यक्त केली. तसेच मुंबई येथे झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *