• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात निघाली संविधान जागर रॅली

ByMirror

Nov 26, 2024
संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला -नाना डोंगरे

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला -नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने संविधान जागर रॅली काढण्यात आली. संविधान दिनानिमित्त निघालेल्या या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. भारतीय संविधानाचा विजय असो…च्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
गावातील नवनाथ विद्यालयापासून निघालेल्या रॅलीचे प्रारंभ मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, प्रमोद थिटे, तेजस केदारी, तृप्ती वाघमारे, भानुदास लंगोटे, मयुरी जाधव, प्रियंका डोंगरे-ठाणगे, साई श्रध्दा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परकाळे, मंदा साळवे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने संविधान जागर रॅलीत सहभागी झाले होते.


प्रारंभी मुंबई येथे झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन यावेळी करण्यात आले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असून, संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली असल्याचे त्यांनी सांगितले. मंदा साळवे यांनी संविधानाने राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सुत्रे आली. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्र्यता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, साई श्रध्दा फाऊंडेशन यांचे सहकार्य व नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *