• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

नूतन वर्षानिमित्त निरीक्षण बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप

ByMirror

Jan 1, 2024

कास्ट्राईब महासंघाची नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने

उपेक्षितांना मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन -एन.एम. पवळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, अतिरिक्त महासचिव सुहास धीवर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रणसिंग, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, शहराध्यक्ष श्‍याम गोडळकर, नाशिक विभाग अध्यक्ष ना.म. साठे, चंद्रशेखर वांढेकर, बुध्दानंद धांडोरे, मुश्‍ताक कुरेशी, सुदाम जाधव, श्‍याम थोरात, समीर वाघमारे, अशोक पंडित, राजेंद्र डोंगरे आदींसह कास्ट्राईबचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.


प्रास्ताविकात के.के. जाधव यांनी दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे प्रारंभ कास्ट्राईब संघटना वंचित घटकातील मुलांना भेट देऊन करत असल्याची माहिती दिली. कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे व बालसुधारगृहातील मुलाचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.


एन.एम. पवळे म्हणाले की, वंचितांसमवेत आनंद साजरा केल्याने समाधान मिळतो. सेलिब्रेशन करण्याची पध्दत बदलत चालली असून, उपेक्षितांना केलेली मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन आहे. कास्ट्राईब उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी व दुर्बल घटकांना आधार देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *