अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 14 वर्षांखालील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 20 व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी शनिवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9: 30 वाजता न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथे होणार आहे.
या निवड चाचणीत 14 वर्षांखालील व 16 वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. 14 वर्षांखालील गटात Triathlon-A, Triathlon-B व Triathlon-C या प्रकारांचा समावेश असून, त्यामध्ये 60 मी. धावणे, लांब उडी (5 मी. रन-अप), उंच उडी (Scissor), Back Throw1 किग्रॅ Shot Put आणि 600 मी. धावणे या प्रकारांचा समावेश आहे. 16 वर्षांखालील गटात 60 मी., 100 मी., 80 मी. अडथळा शर्यत (Hurdles), लांब उडी, गोळा फेक व भाला फेक या प्रकारांचा समावेश आहे.
या निवड चाचणीद्वारे मुले व मुली मिळून एकूण 13 गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली जाणार आहे. प्रवेशिका ऑनलाइन पद्धतीने दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धा स्थळीच घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा हैदराबाद येथे दि. 14 व 16 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. या जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये कोणतेही जिल्हास्तरीय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. ही चाचणी केवळ राष्ट्रीय स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा संघाच्या निवडीच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी प्रा. सुनील जाधव (अध्यक्ष) 9850007135, दिनेश भालेराव (सचिव) 9226238536, श्रीराम सेतू आवारी 9322015046, संदीप घावटे 9309192695, गुलजार शेख 9518769117 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

