• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

ब्राह्मणीच्या महात्मा फुले बालगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप

ByMirror

Nov 27, 2024
थंडीने कुडकुडणाऱ्या बालकांना मिळाली मायेची ऊब

थंडीने कुडकुडणाऱ्या बालकांना मिळाली मायेची ऊब

अनाथ, निराधार मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन -विजय सावंत

नगर (प्रतिनिधी)- थंडीनिमित्त तापमान गारठत असताना ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील विश्‍वशांती सेवाभावी संस्था संचलित महात्मा फुले बालगृहातील विद्यार्थ्यांना डहाळे परिवाराच्या वतीने उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. थंडीने कुडकुडणाऱ्या बालकांना मायेची ऊब देण्यासाठी जुन्नर (जि. पुणे) येथील उद्योजक कैलास डहाळे व स्नेहल डहाळे दांम्पत्य मदतीला धावून आले.
महात्मा फुले बालगृह शासनाचे कोणतेही अनुदान नसताना लोकवर्गणीतून चालत आहे. या संस्थेत अनेक अनाथ, निराधार व दुर्लक्षीत घटकातील मुले शिक्षण घेत आहे. डहाळे परिवाराने महात्मा फुले बालगृहाला नुकतीच भेट देऊन पहाणी केली व विद्यार्थ्यांना ब्लँकेट व अल्पोपहाराचे वाटप केले.


या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सावंत, संस्थेचे सचिव विजय गायकवाड, खजिनदार, कैलास बाबर, संस्थेचे सदस्य अजय सावंत, रमेश सावंत, सदस्य प्रकाश शिंदे, राहुल धुमाळ, गजेंद्रताई शेगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कैलास डहाळे म्हणाले की, शिक्षणाने समाजात बदल घडणार आहे. उपेक्षित व दुर्लक्षीत घटकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन विश्‍वशांती सेवाभावी संस्था समाज घडविण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी नेहमीच मदत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सावंत यांनी सामाजिक संवेदना जागृक ठेऊन कार्य करणाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था चालत आहे. या संस्थेत उपेक्षित मुलांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु आहे. डहाळे परिवाराने दिलेल्या योगदानाचे कौतुक करुन त्यांनी आभार मानले. तर अनाथ, निराधार मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *