भीमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहात अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर
दीन-दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले -आरती शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून कष्टकऱ्यांच्या वेदना जगा समोर आणल्या. त्यांनी कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे व वगनाट्य लिहून मराठी साहित्यात आपले आढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या संघर्षमय जीवनातून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.
नगर-औरंगाबाद रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहात उडान फाउंडेशन व नेहरु युवा केंद्राच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, डॉ. अमोल बागुल, बायडाबाई शिंदे, रजनीताई ताठे, अश्विनी वाघ, पोपट बनकर, रजनी जाधव, बाळासाहेब पाटोळे, अविनाश काळे, रामेश्वर राऊत, रावसाहेब काळे, दत्ता वामन, अविनाश पटारे, राजकुमार चिंतामणी, राजेंद्र कर्डिले, प्रा. रवी सातपुते, दिलीप घुले, जयेश शिंदे, अक्षय शिंदे, कांचन लद्दे, सुभाष जेजुरकर, दिनेश शिंदे, जयश्री शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी अण्णासाहेब साठे यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करून प्रबोधनात्मक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. अमोल बागुल यांनी नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. शाळा न शिकता ही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली.
त्यांनी अकलेची गोष्ट, देशभक्त, घोटाळे, शेठजींचे इलेक्शन, बेकायदेशीर, पुढारी मिळाला, लोकमंत्र्यांचा दौरा, फकीरा असे अनेक कथासंग्रह, कादंबरी, वगनाट्याचे लेखन केले. आजही परदेशात त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो. अशा थोर समाजसुधारक, क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आपण वाचले पाहिजे. या साहित्यातून त्यांचे विचार समाजात रुजले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भिमा गौतमी वस्तीगृहातील मुलींनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर उजाळा टाकला.