• Tue. Apr 21st, 2026

बोल्हेगाव येथे भीम जयंती सोहळ्याचा उत्साहात समारोप

ByMirror

Apr 20, 2026

संविधान जागरातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण; ज्ञानदीप फाउंडेशनचा उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव निर्माण झाल्यास ते जबाबदार नागरिक बनतील -कुमारसिंह वाकळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय भीम जयंती सोहळ्याचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात संविधान जागर, पारंपारिक वाद्यांच्या गजरात सांस्कृतिक सादरीकरणे, भीम गीतांचा कार्यक्रम तसेच विचारप्रवर्तक व्याख्यानांनी उपस्थितांना भारावून टाकले.


या कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ आंबेडकरवादी नेते अशोक गायकवाड, नगरसेवक कुमारसिह वाकळे, महापालिका पाणी पुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुमेध गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संजय कांबळे, संदीप वाघमारे, अण्णा गायकवाड, प्रा. पगारे सर, कौशल गायकवाड, अनिल कजबे, संस्थेचे अध्यक्ष पंकज राजेंद्र लोखंडे, संचालिका प्राजक्ता पंकज लोखंडे, जयश्री गायकवाड, विठ्ठल उमाप, ज्योती साठे, राजेंद्र लोखंडे, क्लेरा लोखंडे, राजू डोईफोडे, अमित लोखंडे, सारंग कराळे, शांताताई कराळे, नितीन साठे, सुदेश गायकवाड आदी उपस्थित होते.


या सोहळ्याच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. तसेच जयंती मिरवणुकीत लेझिम पथकामध्ये सहभागी झालेल्या मुला-मुलींचा विशेष सन्मान करण्यात आला. कु. ज्योती राजेश सकट यांची धर्मदाय आयुक्त निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला, तर प्रांजली पंकज लोखंडे हिने मंथन परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.


संविधान जागर सोहळ्यात देशातील संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भीम गीतांच्या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे यांनीही भीम गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. विठ्ठल उमाप यांनी मार्गदर्शन करत समाजातील एकात्मता व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रफुल्ल लोखंडे या चिमुकल्या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारुन उपस्थितांचे लक्ष वेधले.


प्रास्ताविकात पंकज लोखंडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आज आपण समानतेने उभे आहोत. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या भीम जयंती सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना योग्य दिशा देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आमचा उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण व संविधानिक मूल्ये पोहोचवण्यासाठी ज्ञानदीप फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे आपल्या देशाचे बळ आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय, समता आणि बंधुता पोहोचवण्याचे कार्य संविधान करते. आजच्या पिढीने केवळ जयंती साजरी न करता त्यांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करणे गरजेचे आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर चालल्यास समाज नक्कीच प्रगत करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.


नगरसेवक कुमारसिह वाकळे म्हणाले की, अशा प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव निर्माण झाली, तर भविष्यात ते जबाबदार नागरिक बनतील. ज्ञानदीप फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम निश्‍चितच प्रेरणादायी असून, अशा कार्यक्रमांना अधिकाधिक पाठबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल गायकवाड, जुबेर सय्यद, पूजा लोखंडे, रवी उमाप, जावेद सय्यद, दिलशाद अन्सारी, अनिल डोईफोडे, जॉन्सन लोखंडे, प्रशांत लोखंडे, फारूक पठान, शाहारुख पठान, बाळासाहेब पाटोळे, महेश जाधव, आदेश जाधव, धिरज जाधव, ज्योती जाधव, प्रियंका जाधव, अक्षय लोखंडे, ममता उमाप, कविता डोईफोडे, पुजा डोईफोडे, सना पठाण, सानिया पठाण, शहनाज पठाण, प्रांजली लोखंडे, शुभांगी डोईफोडे, अलमिरा पठाण, आराधना खंडागळे, अनृष्का कदम, अनुष्का गायकवाड, पूर्वा धीवर, श्रध्दा कंठाळी, रेणूका कंठाळी, किर्ती कंठाळी, स्तूती खंडागळे, गौरी उमाप, शुभम डोईफोडे, सान्वी लोखंडे, रिधान उमाप, ऋषीकेश कराळे, असद पठाण, आनंद कंठाळी, रुही पवार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *