राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन
महापुरुषांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान द्यावे -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती महापुरुषांना अभिवादन करुन साजरी करण्यात आली. भिगार येथील इंदिरानगर भागात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, प्राचार्य कैलासराव मोहिते, सुभाषराव होडगे, विशाल बेलपवार, अभिजीत सपकाळ, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, संपतराव बेरड, मनोहर दरवडे, दीपक लिपाणे, जहीर सय्यद, अशोक पराते, अक्षय नागपुरे, दीपकराव बडदे, सागर चवंडके, कुमार धतुरे, भारत ठोकळ, सचिन रोकडे, सागर कांबळे, सदाशिव मांढरे, सर्वेश सपकाळ आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, महापुरुषांचे विचार व कार्य तेवत ठेवण्यासाठी योगदान दिल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. अण्णाभाऊ साठे यांचे पदस्पर्श ऐतिहासिक अहमदनगर शहराला लाभले. त्यांनी या शहरात चळवळ देखील चालवली. समाज सुधारकांची जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी करणे आवश्यक आहे. त्यांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी महापुरुषांचा जयघोष करुन त्यांना उपस्थितांनी अभिवादन केले.