• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

नगरच्या ज्येष्ठ नागरिकांची पंच केदारनाथ यात्रा

ByMirror

Oct 14, 2022

10 दिवसात 165 किलोमीटर पायी प्रवास करुन पदयात्रा दुर्दम्य इच्छाशक्तीने पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथून गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी 10 दिवसात 165 किलोमीटर पायी प्रवास करत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पंच केदारनाथ यात्रा पूर्ण केली. यामध्ये विनायक गोस्वामी, मिलिंद सोनवणे, नाना वाळूंज व रंगनाथ थोपटे यांचा समावेश आहे. या भाविकांनी योग गुरु रामदेव बाबा यांची भेट घेतली, तर पद यात्रेत अभिनेता नाना पाटेकर यांच्याशी संवाद साधला.


केदारनाथसह पंचकेदारांपैकी चार स्थाने म्हणजे मध्यमहेश्‍वर, तुंगनाथ, रुद्रनाथ व कल्पेश्‍वर यामध्ये मध्यमहेश्‍वर व रुद्रनाथ चा पायी प्रवास म्हणजे पूर्ण हिमालयीन पर्वत वर चढणे. निमुळता रस्ता, कधी उंच पायर्‍या तर कधी निसटणारे तेथील दगड-फरशीचे तुकडे, एका बाजूला खोल दरी तर दुसर्‍या बाजूला उंच उंच पर्वत व आजूबाजूला हिमालयीन बर्फाच्छादित पर्वतरांगा, कधी कडकडीत ऊन तर कधी रिमझिम पाऊस, थंड हवेचा जोरदार मारा, अशा परिस्थितीत शारीरिक क्षमतेची कसोटी लावणारी ही पदयात्रा दुर्दम्य इच्छाशक्तीने या ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण केली आहे.


एकूण वीस दिवसात चार धाम यमुनोत्रीधाम, गंगोत्रीधाम, केदारनाथधाम, मध्यममहेश्‍वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पनाथ, बद्रीनाथधाम व विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *