तळागाळातील प्रश्नांसाठी संघर्षाची ग्वाही
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्वसामान्य जनतेचा आवाज -सुशांत म्हस्के
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत शहरातील युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनी पक्षात प्रवेश केला. रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सर्जेपूरा येथील रिपाइंच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे सुशांत म्हस्के यांनी स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनिल वैरागर, पीटर लोंढे, सादिक शेख, प्रशांत आठवले, युसुफ शेख, चांद मणियार, फारूक शेख, अशोक वैरागर, अमीन सय्यद, मुन्ना शेख, मच्छिद्र दांगट, राजू शेख, अर्जुन जव्हेरी, फिरोज शेख, आयन शेख आदींसह कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळ्यास दानिश शेख, राहुल ठोकळ, गुलाम शेख, विजय शिरसाठ, विल्सन रुकडीकर, प्रकाश थोरात, शुभम ठोंबे, अरबाज शेख, लकी वाघमारे, योगेश जावळे, शमुवेल साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुशांत म्हस्के म्हणाले की, समाजातील तळागाळातील आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) सातत्याने संघर्ष करत आहे. वंचित, दुर्बल आणि हक्कांपासून दूर राहिलेल्या घटकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
“रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. कोणत्याही भांडवलदार अथवा व्यापाऱ्यांच्या दावणीला न बांधता समाजातील शेवटच्या घटकाच्या हक्कासाठी पक्ष सातत्याने संघर्ष करत आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठविण्याची भूमिका पक्षाने कायम ठेवली आहे,” असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, शहरातील युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जात असल्याने संघटनेला निश्चितच बळ मिळत आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी रिपाइंच्या विचारधारेनुसार काम करत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या विचारधारेनुसार सर्वसामान्य वर्गाच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये संघटन मजबूत करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

