• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निशुल्क नेत्र व स्त्री रोग तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

ByMirror

Oct 13, 2022

स्वस्तिक नेत्रालय अ‍ॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलचा उपक्रम

अनेक तास स्क्रिनपुढे असल्याने कमी वयातच डोळ्यांचे प्रश्‍न -डॉ. प्रफुल चौधरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील स्वस्तिक नेत्रालय अ‍ॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या निशुल्क नेत्र व स्त्री रोग तपासणी शिबिरास नागरिकांसह महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. चार दिवस चाललेल्या या शिबीरात तब्बल 230 रुग्णांची तपासणी करण्यात आली.


जालिंदर चौधरी व निर्मला चौधरी यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. नेत्र तज्ञ डॉ. प्रफुल चौधरी म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच चष्मे लागणे व डोळ्यांचे विकार निर्माण होत आहे. लहान मुलांसह युवक देखील अनेक तास स्क्रिनपुढे असल्याने डोळ्याचे प्रश्‍न उद्भवत असून, योग्य वेळी उपचार व निदान न झाल्यास या समस्या वाढून जीवन अंधकारमय बनत असल्याचे त्यांनी सांगितले. तर खर्चिक आरोग्य सुविधांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी या मोफत शिबिराचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्त्री रोग तज्ञ डॉ. कल्याणी चौधरी म्हणाल्या की, महिलांनी आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. कुटुंबाचे आरोग्य सांभाळताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. महिलांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्या कुटुंबाची जबाबदारी चांगल्या पध्दतीने सांभाळू शकणार असल्याचे सांगून, त्यांनी व्यायाम व आहारबद्दल मार्गदर्शन केले.


दोन दिवसीय शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आनखी दोन दिवस वाढवून रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले आणि वीस हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रियांचे अनुभवी तज्ञ डॉक्टर तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी गोरक्षनाथ बहिरट, ज्ञानेश्‍वर लंके, सागर गायकवाड, मनिषा गायकवाड, शैलेश सत्रे, माया बर्वे, गायत्री, कावेरी मगर यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *