• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निशुल्क नेत्र व स्त्री रोग तपासणी शिबिर

ByMirror

Oct 10, 2022

स्वस्तिक नेत्रालय अ‍ॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलचा उपक्रम

लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील स्वस्तिक नेत्रालय अ‍ॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर 10 व 11 ऑक्टोबर रोजी निशुल्क नेत्र व स्त्री रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन नेत्र तज्ञ डॉ. प्रफुल चौधरी व स्त्री रोग तज्ञ डॉ. कल्याणी चौधरी यांनी केले आहे.


या दोन दिवसीय शिबीरात दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले आणि वीस हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रियांचे अनुभवी तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. या शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी 9244108108 व 8862027777 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *