• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात ज्येष्ठांची मोफत नेत्र व कान तपासणी

ByMirror

Oct 5, 2022

नवरात्र उत्सवाचा सामाजिक उपक्रम

मोफत आरोग्य शिबीर सर्वसामान्यांना आधार -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, शुभतेज आयुर्वेद अ‍ॅण्ड हेल्थकेअर, वैष्णवी ऑप्टीकल्स, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व कान तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.


शिबीराचे उद्घाटन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, नगर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत बोडखे, दिगंबर जाधव, नेत्रतज्ञ डॉ. ओंमकेश कोंडा, डॉ. वैष्णवी जरबंडी, कान तज्ञ डॉ. शुभम खोसे, डॉ. मिलिंदकुमार वाघमारे, सचिन कापसे, तुकाराम कापसे, शिवाजी कापसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्पर्धामय युग व महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधांचा खर्च पेळवत नाही. मोफत आरोग्य शिबीर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. सण-उत्सव सामाजिक उपक्रमातून साजरे झाल्यास उत्सवाचा खरा आनंद मिळून सर्वसामान्यांना याचा लाभ मिळणार आहे. या शिबीरातून अनेक ग्रामस्थांना योग्य उपचार व मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गावातील नवनाथ मंदिरात झालेल्या या शिबीरात नेत्रतज्ञ डॉ. ओंमकेश कोंडा व डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी नेत्र तपासणी तर कान तज्ञ डॉ. शुभम खोसे, डॉ. मिलिंदकुमार वाघमारे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कानाची तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. या शिबीरात अद्यावत यंत्र सामुग्रीद्वारे तपासणी करुन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरातील गरजू लाभार्थींवर संबधित डॉक्टर अल्पदरात पुढील उपचार करणार आहेत. या शिबीरात तब्बल 180 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी पार पडली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *