राही फाउंडेशनचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
प्रशिक्षणानंतर घरोघरी मिळणार शिवणकामचे रोजगार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राही फाऊंडेशनच्या माध्यमातून शिवणकामचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. घरच्या घरी पाचशे महिलांना रोजगार देणार असल्याचे प्रतिपादन राही फाउंडेशनच्या संचालिका रूपाली करांडे यांनी केले.
महिला स्वयंरोजगार प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी राही फाउंडेशनच्या संचालिका करांडे बोलत होत्या. यावेळी जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, भाऊसाहेब पादीर, उडान संस्थेचे अध्यक्षा ॲड. आरती शिंदे, गौरी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा गीता टेमक, अंगणवाडी सेविका शोभा मोढवे, राही फाउंडेशनचे संचालक निलेश गर्जे आदी उपस्थित होते.
पुढे करांडे म्हणाल्या की, कौशल्य विषयक फक्त प्रशिक्षण घेऊन उपयोग नाही, तर त्या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यात स्वयंरोजगार सुरू करता आला पाहिजे. गरजू महिलांच्या हाताला काम पाहिजे म्हणूनच राही फाउंडेशनने हा प्रकल्प हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षणामधून स्वयंरोजगार ही काळाची गरज आहे. सध्याच्या महागाईच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर मात करून महिला सक्षम करण्यासाठी राही फाउंडेशन महिलांना प्रत्यक्ष घर बसल्या शिवणकाम देऊन स्वयंरोजगारीत करण्यासाठी हा प्रकल्प राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणासाठी बुरुडगाव, आदर्श गाव मांजरसुंबा येथे महिलांची बैठक घेण्यात आली. यावेळी युवती व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. याप्रसंगी पिशव्या, टॉप, शाळेचे गणवेश आणि विविध वस्तू शिवणासाठी देण्यात येणार असल्याचे रूपाली करांडे यांनी सांगितले.
यावेळी शोभा मोढवे, श्वेता गायकवाड, आशा साबळे, प्रिया कुलट, सविता ससाणे, संगीता घोडके, वसुधा नरसाळे, अनिता घोडके, कोमल निमसे, अमृता शिंदे, नंदा शिंदे, प्रियंका खंदारे, सोनल काळे, हिरा रोडे, स्वाती लांगोरे, पुनम मोढवे, मोहिनी कुलाळ, मीनाक्षी कदम, जयश्री वाघमारे, ज्योती वाघमारे, योगिता कदम, शुभांगी वैराळ, रेखा कदम, अश्विनी दांगट, अश्विनी कदम, रूपाली शिंदे, प्राजक्ता कदम, उज्वला वाघमारे, शीतल जगधने, कांचन वाघमारे, वैशाली वाघमारे, सायली कदम, कोमल वाघमारे, योगिता कदम, हिना शेख, गुलनाज शेख आदींसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. महिलांनी शिवणकामाच्या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी राही फाउंडेशन 9921765353 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
