• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

पब्लिक स्कूल वाळुंज शाळेचा 100% निकाल

ByMirror

May 13, 2026
आदिती गोरे हिने 90.20% गुण मिळवून ठरली प्रथम

आदिती गोरे हिने 90.20% गुण मिळवून ठरली प्रथम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पब्लिक स्कूल वाळुंज शाळेचा या वर्षी देखील इयत्ता 10 वी (एसएससी) बोर्डाचा निकाल 100% लागला आहे. शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली आहे.


शाळेच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण होत असून, एसएससी बॅचच्या 14 व्या वर्षी उतरोत्तर शाळेची गुणवत्ता वाढत चालली आहे. विद्यालयाची विदयार्थीनी आदिती श्रीराम गोरे हिने 90.20% गुण मिळवून ती प्रथम आली आहे. विशेष प्रविण्य मध्ये 05 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी मध्ये 10 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये 04 विद्यार्थी तर तृतीय श्रेणी मध्ये 01 विद्यार्थी अशी श्रेणी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे या विदयार्थ्यांनी कोणतीही बाहेरची शिकवणी न लावता स्वतः च्या अभ्यासावर आणि अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनावर यश मिळविले आहे.


या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण सबाजीराव गायकवाड, संस्थेचे सचिव प्रशांत गायकवाड तसेच प्राचार्या, शिक्षकावृंद, पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *