शाळेचा 92 टक्के निकाल; 6 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते मास्तर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल 92 टक्के लागला आहे. 6 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह व 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये संतोष गणेश नाणेकर 83% मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अजित विजय इंगवले 82.40% मिळवत द्वितीय, तर सिद्धार्थ राजेंद्र घुले 89.20% मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. रोशनी अरुण गोपाळघरे 78% चौथा क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब (अण्णा) विधाते, रामदासजी कानडे संस्था सरचिटणीस प्राध्यापक शिवाजीराव विधाते सर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सुसे, प्राथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव म्हस्के सर व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांना सारिका गायकवाड, अमोल मेहेत्रे, सचिन बर्डे या शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
