• Fri. Apr 24th, 2026

अहिल्यानगर जिल्हा अंडर-20 फुटबॉल संघ लोणावळा येथील स्पर्धेसाठी रवाना

ByMirror

Apr 23, 2026

खेळाडूंनी आत्मविश्‍वासाने आणि जिद्दीने खेळ करून जिल्ह्याचे नाव उंचावावे -नरेंद्र फिरोदिया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) तर्फे अंडर-20 फुटबॉल संघाची लोणावळा येथे होणाऱ्या आंतरजिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 21 ते 28 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
संघाचे प्रशिक्षक सचिन पाथरे असून राजेश अँथनी हे संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. संघाने स्पर्धेसाठी चांगली तयारी केली असून खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निमित्ताने एडीएफएचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी संघाला शुभेच्छा देत खेळाडूंनी आत्मविश्‍वासाने आणि जिद्दीने खेळ करून जिल्ह्याचे नाव उंचावावे, असे आवाहन केले. अशा स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.


वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंग मिन्हास आणि अमरजीत सिंग शाही यांनी देखील संघातील खेळाडू व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. सचिव रोनप फर्नांडिस, संयुक्त सचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, राजू पाटोळे यांनी संघाच्या तयारीचे कौतुक करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. खजिनदार ऋषिपाल सिंग परमार व सहायक खजिनदार रणबीर सिंग परमार यांनी देखील संघाला पाठिंबा दर्शवला.


एडीएफएचे च्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी संघाला या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून संघाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अहिल्यानगर अंडर-20 संघ स्पर्धेत दमदार कामगिरी करून जिल्ह्याचा गौरव वाढवेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.
–—–
अहिल्यानगर जिल्हा संघ खालीलप्रमाणे
साहिल कुसाळकर (कर्णधार), आदित्य गुगळे (उपकर्णधार), याह्या सय्यद, पियुष भोसले, जोएल पाथरे, नील धेंडवाल, झैद शेख, प्रद्युम मोरे, आदित्य तळेकर, वेदांत क्षत्रिय, ओम म्हस्के, उत्कर्ष सोनावणे, पार्थ मस्कर, अभय थोरात, प्रतीक शिंदे, प्रणव पंडित, अमर शेख, परेश म्याना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *