• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

संभागस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर शूटिंग क्लबचा दबदबा

ByMirror

Apr 23, 2026
संभागस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर शूटिंग क्लबचा दबदबा

खेळाडूंची पदकांची लयलूट; दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केन्द्रीय विद्यालय संगठन, मुंबई संभाग रिजनलच्या वतीने आयोजित संभागस्तरीय खेलकूद स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय इंटर स्कूल शूटिंग स्पर्धेत अहिल्यानगर शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करत खेळाडूंनी विविध पदके पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.


या स्पर्धेत तेजस किरगत आणि महावीर पोटे यांनी सुवर्ण पदकांची कमाई करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. अनन्या शिंदे आणि अथर्व ठुबे यांनी रौप्य पदक पटकावले, तर रेवा शिंदे हिने कास्य पदक जिंकले. याशिवाय आदेश खराडे याने सहावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे, अनन्या शिंदे आणि तेजसकुमार किरगत या दोन्ही खेळाडूंनी बेंचमार्क स्कोरपेक्षा अधिक गुण मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.


या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले आणि सागर फाटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबच्या सचिव सुनीता लिपने यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न घेतले. या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, आमदार संग्राम जगताप, खासदार नीलेश लंके, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांच्यासह विविध मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *