• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

कान्हूर पठारच्या निखिल शिंदे यांचे एमपीएससीत यश

ByMirror

Apr 13, 2026
मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी निवड

मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी निवड


जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर मिळवले यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कान्हूर पठार येथील निखिल नंदू शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयातील महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती मिळवली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. कुटुंबीयांचे पाठबळ, स्वतःची मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी अखेर यशाचा मुकुट आपल्या नावावर केला.


निखिल शिंदे हे शिक्षक नेते प्रसाद शिंदे यांचे बंधू आहेत. त्यांचे वडील नंदू शिंदे हे राज्य परिवहन मंडळ, पारनेर येथे कंडक्टर म्हणून कार्यरत होते. अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून आलेल्या निखिल यांनी कोणत्याही प्रकारच्या अडचणींना न जुमानता जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.


त्यांचे आजोबा भगवान शिंदे,आई मोहिनी शिंदे, चुलते सुनील शिंदे, सुभाष शिंदे, अमोल भोसले, आकाश शिंदे, मयूर शिंदे, अनिकेत शिंदे, किशोर शिंदे,, मीना शिंदे, सुजाता शिंदे, भाग्यश्री शिंदे, प्रीती शिंदे, हिराबाई शिंदे, हिंदवी शिंदे तसेच मित्रपरिवाराने त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *