• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावात मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Nov 27, 2025
“कचरा करणार नाही, करु देणार नाही” या संकल्पासाठी आमदार जगताप यांचे आवाहन

18 वर्षापासून सामाजिक संवेदना जपून वासन परिवार देत असलेले योगदान प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप

“कचरा करणार नाही, करु देणार नाही” या संकल्पासाठी आमदार जगताप यांचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने वासन परिवार योगदान देत आहे. मागील 18 वर्षापासून सामाजिक संवेदना जपून सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी मागील 18 वर्षांपासून वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजय वासन व तरुण वासन यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन केले जात आहे. पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते अमेय साठे (दिल्ली), आनंदऋषी नेत्रालयाचे आनंद छाजेड, डॉ.सुमित शिंदे, डॉ. कुंडलिक राठोड, कमल गायकवाड, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, घर घर लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, दिलीप डुंगुरवाल, अमेय साठे, जनकल्याण रक्त पेढीचे डॉ.मीना फुके, डॉ. सोनाली खांडरे, नितेश बनसोडे, राकेश गुप्ता, संजय आहुजा व वासन परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत असताना, शहर स्वच्छतेची जबाबदारी देखील नागरिकांची आहे. स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांवर सार्वजनिक स्वच्छतेचे संस्कार रुजवावे लागणार आहे. “कचरा करणार नाही, करु देणार नाही”हा संकल्प घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. पद्मश्री पोपट पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपताना वंचित समाजातील घटकांना मदतीचा हात महत्त्वाचा असून, वासन व आहुजा परिवार सातत्याने सामाजिक योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी सांगितले की, या उपक्रमातून वंचितांची सेवा ही ईश्‍वर सेवा म्हणून केली जात आहे. गोरगरीबांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी ते सातत्याने हातभार लावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या शिबिरात 224 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 28 गरजू रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 48 गरजूंना नंबरचे चष्मे देण्यात आले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये 26 रक्त पिशव्या संकलीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल जाधव यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *