• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

बारादरी येथील स्वामी विवेकानंद विद्यार्थी वस्तीगृहात मोफत सुविधांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

ByMirror

Jun 2, 2025
अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्याच्या बारादरी, मेहेकरी येथील वीरभद्र डोंगर परिसर ग्रामीण विकास संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यार्थी वस्तीगृहात अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्याचे आवाहन वस्तीगृहाचे अधीक्षक एम.एन. तोडमल यांनी केले आहे.


सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे. वस्तीगृहामार्फत मुलांना शालेय साहित्य, शाळेचा गणवेश मोफत देण्यात येणार आहे. भव्य क्रीडांगणाचा समावेश असलेल्या या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान, स्पर्धा परीक्षेची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे वस्तीगृहामध्ये मुलांना तीन वेळचे जेवण, निवासाची सोय व गरम पाण्याची व्यवस्था मोफत असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्वरित वस्तीगृहाशी संपर्क साधून प्रवेश निश्‍चित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9326761869 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *