• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

वाढदिवस साजरा ज्ञानमंदिर उभारणीसाठी

ByMirror

Jun 3, 2025
समर्थ कार्यासाठी समर्थ पाठिंबा

समर्थ कार्यासाठी समर्थ पाठिंबा


समर्थ प्रशालेच्या बांधकामासाठी विद्यार्थिनीची आर्थिक मदत

नगर (प्रतिनिधी)- श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी (माध्यमिक विभाग) येथील इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. अनुश्री दिगंबर गवळी हिचा वाढदिवस यावर्षी एका वेगळ्या व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. इतर कुठलाही खर्च न करता, अनुश्रीच्या वडिल दिगंबर गवळी यांनी आपल्या कन्येच्या हस्ते मंडळाच्या सहकारनगर, सावेडी येथील नवीन समर्थ प्रशालेच्या बांधकामासाठी आर्थिक मदतीचा धनादेश संस्थेस दिला.


अनुश्रीचा वाढदिवस एक वेगळा दृष्टिकोन घेऊन पुढे आला. फुगे, केक, गिफ्ट्स नकोत, तर शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या शाळेच्या उभारणीत स्वतःचा सहभाग हवा, अशी प्रेरणा देणारा हा सकारात्मक उपक्रम ठरला. गवळी हे एमआयडीसीतील एसीई फिडस्‌ येथे व्यवस्थापक (मॅनेजर) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अनुश्रीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण अशा शाळेच्या उभारणीत सहभाग घेतला आहे, जिथून शेकडो विद्यार्थी भविष्यात समाजसेवेसाठी सिद्ध होतील. ही गोष्ट अनुश्रीला मोठेपणी अभिमान वाटावा अशा पिढी घडवणाऱ्या शाळेसाठी साजरा करण्यात आल्याचे, ते म्हणाले.


या स्तुत्य कार्याबद्दल गवळी यांचा किशोर देशपांडे (नवीन समर्थ प्रशालेचे बांधकाम प्रमुख, कार्यकारिणी सदस्य व शालेय समिती अध्यक्ष), व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सचिव सुरेश क्षीरसागर व प्राचार्या श्रीम. जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक सुनील कानडे, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. सर्वांनी अनुश्रीचे व तिच्या कुटुंबाचे अभिनंदन करत ही कृती ज्ञान मंदिर उभारणीला सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *