• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

दामोदर विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

ByMirror

May 14, 2025
92 टक्के घेऊन पूजा निवडूंगे शाळेत प्रथम

92 टक्के घेऊन पूजा निवडूंगे शाळेत प्रथम

नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील जनकल्याण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित कै. दामोदर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे गुण मिळवून यश संपादन केले. शाळेचा 89.13 टक्के निकाल लागला.


विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक- पूजा किशोर निवडूंगे (92 टक्के), द्वितीय क्रमांक- कार्तिकी नागेश आरे (91.80 टक्के), तृतीय- प्रेम सुनिल मिसाळ (84.20 टक्के) क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे.
विद्यालयातील 8 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 18 विद्यार्थी द्वितीय तर 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दहावीच्या विद्यार्थ्यांना सारिका गायकवाड, अमोल मेहेत्रे, सचिन बर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे विश्‍वस्त बाळासाहेब (अण्णा) विधाते, रामदास कानडे, संस्था सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सुसे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *