• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

सरकारी कर्मचारी संघटनेचे श्रीकांत शिर्शिकर यांचे निधन

ByMirror

Mar 19, 2025

नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी संघटनेचे खजिनदार श्रीकांत तथा बंडा प्रभाकर शिर्शिकर यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.14 मार्च) निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. बंडा शिर्शिकर या नावाने ते सुपरिचित होते. इरीगेशन विभागाचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. राज्य कर्मचारी संघटनेचे कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, धरणे यांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.


संघटनेचे सरचिटणीस कै. योगीराज खोंडे यांचे ते अतिशय निकटचे आणि विश्‍वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. अनेक वर्षापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी संघटनेच्या खजिनदार पदाची धूरा सांभाळली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या रास्त आणि हक्काच्या मागण्यांसाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झटणारा एक सच्चा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख होती.

शनिवारी (दि.15 मार्च) नालेगाव अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, नात, एक भाऊ, बहिण असा परिवार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *