• Mon. Feb 16th, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केली निराधार व वंचित घटकातील ज्येष्ठांची दिवाळी गोड

ByMirror

Oct 29, 2024

मिठाई व फराळचे वाटप

वंचितांच्या अंगणात सामाजिक सेवेचा दिवा प्रज्वलीत करुन समाज प्रकाशमान करण्याचा प्रयत्न -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण व आरोग्य क्षेत्रासह सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निराधार व वंचित घटकातील ज्येष्ठ नागरिकांची दिवाळी गोड करण्यात आली. भिंगार व शहरातील विविध मंदिरांच्या ठिकाणी भेटी देऊन तेथे बसलेल्या निराधार घटकातील व्यक्तींना मिठाई व फराळचे वाटप करण्यात आले.
भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करुन मिठाई व फराळचे पाकिट भेट देण्यात आले. तसेच भिंगार येथील शैनेश्‍वर मंदिर, सर्जेपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर व माळीवाडा येथील शनी मारुती मंदिर येथील निराधार असलेल्या भिक्षेकरी यांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले.


महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार (मुन्नाशेठ) झंवर व हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते मिठाईच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. यावेळी रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, सुमेश केदारे, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, मनोहर दरवडे, रतन मेहेत्रे, हरीश साळुंके, दीपकराव धाडगे, अशोकराव पराते, दीपकराव बडदे, अभिजीत सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, प्रवीण परदेशी, शेषराव पालवे, विलासराव आहेर, गोरक्षनाथ वामन, अविनाश जाधव, मेजर विनोद खोत, संपतराव बेरड, रमेश खंडेलवाल, सुनील कसबे आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, दिवाळी सण आनंद लुटण्याचा नव्हे आनंद वाटण्याचा सण आहे. या भावनेने निराधारांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक योगदान देऊन वंचितांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. वंचितांच्या अंगणात सामाजिक सेवेचा दिवा प्रज्वलीत करुन समाज प्रकाशमान करण्यासाठी हरदिनचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


नंदकुमार (मुन्नाशेठ) झंवर यांनी दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण असून, वंचितांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य हरदिनच्या सदस्यांनी केले आहे. वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


या उपक्रमासाठी सलाबत खान, पोपटराव भांड, सखाराम अळकुटे, दशरथ मुंडे, शिवान शिंदे, किरण फुलारी, सुभाष पेंढुरकर, अविनाश पोतदार, दिलीप बोंदर्डे, कुमार धतुरे, संजय भिंगारदिवे, अजय आठवले, प्रशांत भिंगारदिवे यांचे परिश्रम लाभले. तसेच गरजू लोकांना जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम करणाऱ्या भिंगार येथील उन्नती सेवाभावी संस्थेला मिठाई व फराळचे पाकिट उपलब्ध करुन ते गरजूंपर्यंत पोहचविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *