• Mon. Nov 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

वीरशैव कक्कय्या समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास राज्यासह, कर्नाटक राज्यातून मोठा प्रतिसाद

ByMirror

Nov 2, 2026
समाजाच्या सभागृह जागेसाठी मदत करणार -आ.संग्राम जगताप

समाजाच्या सभागृह जागेसाठी मदत करणार -आ.संग्राम जगताप


वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने वीरशैव कक्कय्या समाज एकवटला; समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीचा निर्धार!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विवाहयोग्य युवक-युवतींना अनुरूप जीवनसाथी निवडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजातील एकोपा, संघटन आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील वीरशैव कक्कय्या समाजातील समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने एकत्र आले. विवाह जुळविण्याच्या सामाजिक उपक्रमासोबतच समाजाची एकजूट आणि विकासाचा संकल्प करण्यात आला.


शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे यांच्या अध्यक्षतेखाली या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, आयएफएस (गुजरात) अधिकारी श्रीकांत केळगंद्रे, नगरसेविका रोशनी त्र्यंबके, पाथर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक डॉ. जगदीश मुने, धनंजय कोकणे, हनुमंत सोनवणे, राधाकिसन त्रिंबके, वसंतराव केळगंद्रे, डॉ. पी. डी. सोनवणे, अशोक पाटेकर, बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक सोमनाथ गजाकोष, परशुराम इंगोले,bयशवंत नारायणकर, राजेश होटकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील लोकांना एकत्र आणून समाजाची प्रगती साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडत असते. अनुरूप जीवनसाथी शोधण्याची प्रक्रिया अशा मेळाव्यांमुळे अधिक सुलभ होते. त्यामुळे समाजाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विवाह जुळविण्याबरोबरच समाजातील युवक-युवती, कुटुंबे आणि समाजबांधव यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य वाढविण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.


वीरशैव कक्कय्या समाजाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह शुभकार्यांसाठी अहिल्यानगर शहरात स्वतंत्र सभागृह उभारण्याच्या दृष्टीने पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली. मात्र, शासनाकडून जागा उपलब्ध झाल्यानंतर सभागृहाच्या बांधकामासाठी तसेच भविष्यातील देखभाल व व्यवस्थापनासाठी समाजानेही लोकसहभागातून आर्थिक योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजाच्या विकासासाठी शासनाच्या मदतीसोबतच समाजबांधवांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी वीरशैव कक्कय्या यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातूनही विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयएफएस अधिकारी श्रीकांत केळगंद्रे यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजबांधवांनी एकमेकांना सहकार्य करावे आणि एकजुटीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकाने परस्परांना साथ दिल्यास सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला अधिक गती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.


रमेश त्रिमुखे म्हणाले की, समाजातील युवा पिढीने उच्च शिक्षण घेण्याबरोबरच व्यवसायाभिमुख होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधणे ही काळाची गरज आहे. विवाहासाठी जीवनसाथी निवडताना केवळ रंग-वर्ण किंवा बाह्यरूपाला महत्त्व न देता व्यक्तिमत्त्वातील कला, गुण, स्वभाव आणि कर्तृत्वाला प्राधान्य द्यावे. तसेच वीरशैव कक्कय्या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. या मागणीसाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन शासनदरबारी पाठपुरावा करण्याबरोबरच सरकारवर लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.


मेळाव्यामध्ये विवाहयोग्य युवक-युवतींचा परिचय करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निवृत्त तहसीलदार छाया चौधरी आणि ॲड. मनीषा केळगंद्रे यांनी पार पाडली. हा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी भानुदास केळगंद्रे (बंडू मेजर), लालशेठ त्र्यंबके, डॉ. राहुल त्रिमूखे, शनिधर त्र्यंबके, राजेंद्र त्र्यंबके, विकास त्रिंबके, छाया त्र्यंबके, रेश्‍मा त्र्यंबके, प्रकाश सोनटक्के, राजेंद्र सोनटटक्के उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके, सचिव प्रकाश कोकणे, गणेश नारायण, खजिनदार किशोर भालशंकर, ॲड. मनीषा शिंदे, कार्यकारणी सदस्य अनिल त्रिमुखे, प्रशांत डहाके, राजू कोकणे, संजय कवडे, संजय खरटमळ, ओमप्रकाश कवडे, डॉ. विद्याधर त्र्यंबके, प्रवीण त्र्यंबके, सुरेंद्रकुमार बोराडे, शशिकांत डहाके, गणेश शिंदे, सुभाष बोराडे, विनोद इंगळे, संतोष सोनटक्के, सतीश केळगंद्रे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *