• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई अल्काझरचे अनावरण

ByMirror

Sep 12, 2024
इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई अल्काझरचे अनावरण

अल्काझरचे विविध गुणवैशिष्टये व दणकटपणा ग्राहकांच्या पसंतीस उतरेल -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्‍चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये दी ऑल न्यू ह्युंदाई फेसलिफ्ट अल्काझर या कारचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजगमवार, सेल्स मॅनेजर अजय मगर,संदीप देवकाते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ह्युंदाई कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन आकर्षक कारचे मॉडेल्स बाजारात आनले आहे. भारतीयांचा विचार करुन या कारची रचना करण्यात आलेली असून, एकत्र कुटुंब पध्दतीसाठी सात सीटर कारकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. न्यू ह्युंदाई फेसलिफ्ट अल्काझरचे विविध गुणवैशिष्टये व दणकटपणा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.


भारतातील एकत्र कुटुंब पध्दतीचा विचार करुन जास्त सदस्य बसू शकतील अशा वाहनांना पसंती मिळत आहे. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून, त्यामुळे बाजाराते सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच आता कंपन्याही त्यांच्या 5-सीटर एसयूव्ही कारचे सात-सीटर मॉडेल्स लाँच करत आहे. यातच कार निर्माता ह्युंदाई इंडिया सुध्दा देशातील बाजारात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. ह्युंदाई इंडियाने नवीन अल्काझर यफेसलिफ्ट आली असून, नवीन वाहनाच्या सेगमेंट मध्ये वाजवी दरात उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत. तसेच सात टायटन ग्रे मॅट, स्टाररी नाईट, रेंजर खाकी, ॲबिस ब्लॅक, ॲटलस व्हाइट, रोबस्ट एमराल्ड पर्ल, रोबस्ट एमराल्ड मॅट आणि फायरी रेड या रंगचा समावेश आहे.


अल्काझार पेट्रोल व डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ही कार चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचरमध्ये बुकिंग केली जाऊ शकते. ही एसयूव्ही दिसायला पूर्वीपेक्षा खूपच मजबूत व आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे. नवीन फेसलिफ्ट अल्काझरचे आणखी सेफ्टी सुधारण्यासाठी, कंपनीने त्यात ॲडव्हान्स ड्रॅव्हिंग असिस्टंट सिस्टम (एडीएएस) समाविष्ट केला आहे. यात 70 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यात 6 एअरबॅग्ज, व्हॉईस ऍक्टिव्हेटेड पॅनोरामिक सनरूफ, पॅडल शिफ्टर्स, पॉवर ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट्स, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग पोर्ट, लेदर अपहोल्स्ट्री, साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, ऑन-बोर्ड आहेत. नेव्हिगेशन 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
नामवंत बँका व फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी 100 टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. ह्युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीची एक्सचेंज सुविधा देण्यात आलेली आहे. दररोज ग्राहकांची बुकिंग साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सदर वाहन ईलाक्षी ह्युंदाई मध्ये डेमो व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ईलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *