• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त भंडारा

ByMirror

Jul 15, 2024
जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त भंडारा

धार्मिक ऐक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक ऐक्याचा संदेश देत जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त सर्व धर्मिय भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते भंडाऱ्याला प्रारंभ करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला.


यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष इरफान बेग, शहानवाज सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, सरफराज सय्यद, मुन्नू शेख, मतीन शेख, आफताब शेख, सैफ सय्यद, सुफियान सय्यद, मुबिन सय्यद, फैजअली शेख, कुद्दुस शेख, अज्जू शेख, शाहिद वस्ताद, अतिक तांबोळी, अयान शेख, शाहरुक सय्यद, अरबाज सय्यद, शहेबाज शेख, समीर सय्यद, सोनू शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक एकात्मतेचे दर्शन जुना बजार यंग पार्टीच्या उपक्रमातून घडते. अन्नदान हे पुण्याचे काम असून, हा उपक्रम राबवून जुना बजारच्या युवकांनी मोहरमचा एक चांगला पायंडा निर्माण केला आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून अनेक गरजूंना आधार देखील मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


अभिषेक कळमकर म्हणाले की, जुना बजार येथील सर्व धर्मिय बांधव गुण्यागोविंदाने राहत आहे. एकमेकांच्या सुख, दु:खात तर सण, उत्सवात ते सहभागी होत असतात. दरवर्षी होणारा भंडाऱ्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे. यावर्षी आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी आल्याने धार्मिक एकतेचे दर्शन घडणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *