• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारकरी परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी घनश्याम म्हस्के

ByMirror

Jan 29, 2023

राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती

समाजात धार्मिकतेने संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु -विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळकचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते घनश्याम म्हस्के यांची आखिल विश्‍व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांच्या हस्ते म्हस्के यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक सुरेश काळे, संदीप कोतकर, दादासाहेब झावरे, भाऊराव सोनवणे, ह.भ.प. गंगाधर पुंड, गणेश कोतकर, संदीप पुंड, विशाल वाघमारे आदी उपस्थित होते.

घनश्याम म्हस्के


निंबळक (ता. नगर) येथील घनश्याम म्हस्के राजकारण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. ते माजी उपसरपंच असून, सध्या सोसायटीचे सदस्य आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते सामाजिक व धार्मिक क्षेत्रात योगदान देत आहे. तर विविध संघटनेचे पद भूषवित आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे विजय भालसिंग यांनी स्पष्ट केले. तर समाजात धार्मिकतेने संस्कार रुजविण्यासाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


घनश्याम म्हस्के यांनी सत्काराला उत्तर देताना संघटनेच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन समाजातील प्रश्‍न सोडविण्यास कार्यरत राहणार आहे. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेने कार्य सुरु असून, धार्मिक कार्याला सामाजिकतेची जोड देऊन विविध प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडीबद्दल आखिल विश्‍व वारकरी परिषदचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते, जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर उल्हारे, जिल्हा सचिव दिलीप महाराज साळवे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर, शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे, जामखेड तालुकाध्यक्ष भिमराव मुरुमकर, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा साबळे यांच्यासह राज्य व जिल्हा पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *