• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

वारकरी परिषदच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जालिंदर उल्हारे

ByMirror

Jan 16, 2023

सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते जालिंदर उल्हारे यांची आखिल विश्‍व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माळीवाडा येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांच्या हस्ते उल्हारे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवीचे भगत पोपट साठे, राजू मतकर, विठ्ठल पारटे, राहुल झोडगे, उमेश साठे आदी उपस्थित होते.

जालिंदर उल्हारे


घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील जालिंदर उल्हारे यांचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते सामाजिक योगदान देत आहे. तर विविध संघटनेचे पद भूषवित आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे भालसिंग यांनी सांगितले.


जालिंदर उल्हारे यांनी संघटनेच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन समाजातील प्रश्‍न सोडविण्यास कार्यरत राहणार आहे. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेने कार्य करुन वंचित घटकांना आधार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडीबद्दल आखिल विश्‍व वारकरी परिषदचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते, जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, जिल्हा सचिव दिलीप महाराज साळवे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर, शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे, जामखेड तालुकाध्यक्ष भिमराव मुरुमकर, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा साबळे यांच्यासह राज्य व जिल्हा पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *