• Tue. Nov 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिव्यांग आणि अंध बांधवांना मिठाई, दिवाळीचा फराळ वाटप

ByMirror

Nov 17, 2026
दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळी व भाऊबीजचा आनंद

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळी व भाऊबीजचा आनंद


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी आणि भाऊबीज हा आनंद, आपुलकी, प्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण आहे. या सणाचा गोडवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिव्यांग आणि अंध बांधवांना मिठाई, दिवाळीचा फराळ तसेच टॉवेलचे वाटप करण्यात आले.


ग्रुपचे सदस्य सार्थक चोपडा आणि जहीर सय्यद यांच्या पुढाकारातून दिव्यांग व अंध व्यक्तींसाठी दिवाळी भेट उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित दिव्यांग आणि अंध बांधवांना मिठाई, फराळ आणि टॉवेलचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, उद्योजक राजू चंगेडिया, लॉरेन्स स्वामी, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, सार्थक चोपडा, जहीर सय्यद, ताराचंद ठोकळ, संजय भिंगारदिवे, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, दिलीप ठोकळ, दीपक धाडगे आदी उपस्थित होते.


दिवाळी हा आनंदाचा सण असला, तरी समाजातील अनेक घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचत नाही. अशा व्यक्तींना सणासुदीच्या काळात आपुलकीची जाणीव करून देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. केवळ भेटवस्तूंचे वाटप न करता सामाजिक जिव्हाळा, बंधुभाव आणि माणुसकीची भावना जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


समाजातील गरजू, दिव्यांग आणि वंचित घटकांसोबत सण साजरे केल्याने सणांचा खरा आनंद द्विगुणित होतो, अशी भावना संजय सपकाळ यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *