• Tue. Aug 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

पोस्को, अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगच्या गुन्ह्यातील शेवगावच्या त्या आरोपीला जामीन

ByMirror

Jan 15, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील पोस्को, अ‍ॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखले झालेला आरोपी कृष्णा कापकर याला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे.


शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम 8 व 12 आणि अनुसूचित जाती, जमाती अधिनियम कलम, भारतीय दंड संहिताचे कलम 452, 342, 354 अ, 323, 506 अन्वये एका महिलेने 14 डिसेंबर 2022 रोजी आरोपी कृष्णा संजय कापकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपीला अटक करून जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे हजर करण्यात आले होते. आरोपीला पोलीस पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडीचा आदेश देण्यात आला होता.


त्यानंतर आरोपीने जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक सहा अहमदनगर यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्जामध्ये अ‍ॅड. शर्मिला यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक 6 यांनी 11 जानेवारी रोजी जामीन मंजूर केलेला आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. शर्मिला यांनी काम पाहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *