• Mon. Jul 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

दसर्‍याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीची धूम

ByMirror

Oct 5, 2022

वासन टोयोटात ग्राहकांची गर्दी

मागील दोन वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदीत दुपटीने वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- दसर्‍याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी दिसून आली. विजया दशमीच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण केले. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी केली होती. सनई-चौघड्यांच्या सुरात ग्राहकांचे शोरुममध्ये स्वागत करण्यात आले. दिवसभरात तब्बल 27 कारचे वितरण करण्यात आले. तर काहींनी दिवाळी पाडव्यासाठी अत्तापासूनच बुकिंग दिली आहे.


गाडीची विधीवत पुजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नवीन चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, सहाय्यक महाव्यवस्थापक दिपक जोशी, टीम लीडर प्रविण जोशी, रविंद्र थोरात, चेतन देशमुख, सेल्स ऑफिसर अविनाश लाळगे, अतुल चव्हाण, कुलदीप भाटियानी, संदीप काकडे, संकेत अवघडे, अक्षय परळकर, सुरेश सुयोग, साधना गुंजाळ, स्वप्निल खोडदे, प्राची जामगावकर आदींसह ग्राहक वर्ग मोठ्या सख्येने उपस्थित होते.


कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देऊन कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व योग्य किंमत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांकडे ग्राहकांचा कळ अधिक आहे. तसेच सुसज्ज शोरुम, वर्कशॉपच्या माध्यमातून तत्पर सेवा, कुशल कामगार वर्ग यामुळे ग्राहक टोयोटाला पसंती देत आहे.

इन्होवा पेट्रोल, फॉर्च्युनर, ग्लांझा, अर्बन क्रुझर हाईराइडर या टोयोटाच्या वाहनांना मागणी आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदीत दुपटीने वाढ झाली असून, दुचाकीपेक्षा चारचाकीकडे ग्राहकांचा कळ अधिक असल्याची माहिती शोरुमचे अनिश आहुजा यांनी दिली.


शोरुममध्ये वाहनांच्या खरेदी व बुकिंगवर आकर्षक सवलत उपलब्ध करुन देण्यात आली असून, ग्राहकांना शोरुमला भेट देण्याचे आवाहन जनक आहुजा यांनी केले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *