• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

जीवन समृध्द करण्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण आवश्यक -अ‍ॅड. महेश शिंदे

ByMirror

Jan 10, 2023

तीन दिवसीय युवा नेतृत्व प्रशिक्षण व समुदाय विकास शिबिराचे उद्घाटन

नेहरू युवा केंद्र व जय युवा अकॅडमीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवन समृध्द करण्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण आवश्यक असून, मानसिक शारीरिक संतुलनासाठी प्रशिक्षणामार्फत माहिती घेतली पाहिजे. तज्ञांची मार्गदर्शन जीवनाला नवी कलाटणी मिळून देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा आदर्श युवा पुरस्कार विजेते अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले.


युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र अहमदनगर व जय युवा अकॅडमी आयोजित तीन दिवसीय युवा नेतृत्व प्रशिक्षण व समुदाय विकास शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. शिंदे बोलत होते. भीमा गौतमी वसतीगृहात सुरु झालेल्या या शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, युनिव्हर्सलचे सागर अलचेट्टी, रयाचे पोपट बनकर, उडाणच्या आरती शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, वसतीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव, गायत्री गुंड, अमोल तांबडे, सुवर्णा कैदके, कावेरी कैदके, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.


पुढे अ‍ॅड. शिंदे म्हणाले की, समुदाय विकासासाठी इतरांना मदत केली तर आपल्याला यश निश्‍चितच मिळते. सांघिक प्रयत्न केले तर निश्‍चितच प्रगती होते. यासाठी गरजूंना मदत करुन समुदायाला बरोबर घेऊन विकास साधण्याचे त्यांनी आवाहन केले. तर भारतातील सर्वात मोठे युवा संघटन नेहरू युवा केंद्र असून, युवा वर्गाच्या विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविते त्याचा लाभ युवकांनी घेण्याचे स्पष्ट केले.


या तीन दिवसीय शिबिरामध्ये खेळ, कौशल्य विकास, महिला मंडळ भेट, सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपट, चित्रपट, विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक तथा राज्य उपनिदेशक शिवाजीराव खरात, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *