• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

जनसेवा हीच ईश्‍वर सेवा -वनिता कसबे

ByMirror

Dec 16, 2022

धोत्रे बुद्रुकच्या ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

गरजूंना नंबरचे चष्मे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या सेवेतच खरे समाधान असून, जनसेवा हीच ईश्‍वर सेवा आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांना आरोग्यसेवेच्या माध्यमातून आधार देण्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले गेले असल्याचे प्रतिपादन धोत्रे बुद्रुकच्या सरपंच वनिता कसबे यांनी केले.


पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथे सरपंच कसबे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करुन त्यांना नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. या शिबिराचे उद्घाटन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच रोशनी रोडे, वनिता कसबे, माजी सरपंच बाबासाहेब सासवडे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नाईकवाडी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नंदकुमार राहिंज, सामाजिक कार्यकर्ते राजू रोडे, पप्पूशेठ कसबे, नीलम भांड, योगिता राहिंज, पारूबाई भांड, अश्‍विनी भांड आदींसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


अरुण रोडे म्हणाले की, समाजाला देणे लागते या भावनेने प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक भावनेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून, या शिबिराद्वारे गरजूंची सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसरपंच रोशनी रोडे यांनी गावाचा विकास साधत असताना, सर्वसामान्यांचा विचार करुन विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गरजू घटकांना प्रवाहात आनण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरास आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. शिबिराच्या माध्यमातून गावातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *