• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

केंद्र सरकारचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ByMirror

Dec 15, 2022

पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय.सी.यू. चा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय. सी.सू. यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्येक शनिवारी सदर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या शिबिरामध्ये सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी, ईसीजी, एक्सरे, हिमोग्लोबीन व रक्तातील साखर तपासणी, रक्तातील पेशी तपासणी या सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. या शिबिरात पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय. सी. यु. मध्ये गेल्या 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. विजय पाटील (अस्थिरोग तज्ज्ञ) यांच्या मार्फत गुढघेबदली, सांधेबदली, खुबाबदली असे हाडांचे व मणक्यांच्या विविध आजारांची मोफत तपासणी होणार आहे.

तर डॉ. शरद मोहरकर (एम.डी. मेडिसिन ) यांच्या मार्फत हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पचनाचे आजार, श्‍वसनाचे आजार, विषबाधा व इतर आजाराबद्दल तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी गोरक्ष जाधव यांच्याशी 8380853625, 99707 37637 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *