• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारच्या रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात गरजूंना अन्नदान

ByMirror

Jan 7, 2023

मारुती पवार मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम

समाजकारणाच्या ध्येयाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कार्य -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील श्री रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात गरजूंना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. मारुती पवार मित्र परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

डॉ. श्रीकांत गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे सरचिटणीस मारुती पवार, महेश गोंडाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, देवेंद्र जाधव, नागरदेवळे उपसरपंच रोहित भुजबळ, उमेश धोंडे, संतोष हजारे, भरत गारुडकर, भिंगार युवक शहराध्यक्ष संजय खताडे, गणेश बोरुडे, रविशेठ नामदे, अभिजित ढाकणे, सागर चवांडके, लहू कराळे, अनिकेत हजारे आदी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, राष्ट्रवादीतील युवक पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक भावनेने वंचित दुर्बल घटकांना आधार देत आहे. समाजकारण हे ध्येय समोर ठेऊन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कार्य सुरु आहे. भिंगारमध्ये मारुती पवार यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या राजकीय व सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.


मारुती पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला जात आहे. नागरिकांना इतर मुद्दयांपेक्षा विकास अपेक्षित आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भिंगार शहरातील अनेक प्रश्‍न सोडविण्यात आले आहेत. तर प्रा. माणिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी पक्षात कार्य करत आहे. युवा वर्गाच्या सक्षम फळीने पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *