• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

बेपत्ता झालेल्या आईचा शोध लावण्याची मुलांची आर्तहाक

ByMirror

Dec 26, 2022

वडिलांची लहान मुलांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव

महिना उलटत असताना बेपत्ता कविता शेळकेचा शोध लावण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- घरातून बेपत्ता झालेल्या आईचा शोध लावण्याची तिच्या मुलांनी आर्तहाक दिली. वडिलांसह त्यांच्या लहान मुलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे बेपत्ता झालेली (आई) कविता शेळके हिचा शोध घेण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.

कविता शेळके (बेपत्ता)


कविता अशोक शेळके (वय 29 वर्षे) या चास (ता. अकोले) येथून 29 नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे पती राहुरीला एका लग्नाला गेले असता हा प्रकार घडला. सर्व नातेवाईकांकडे विचारपूस करुन देखील पत्नीचा शोध लागत नसल्याने पती अशोक शेळके यांनी अकोले पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे.


महिना उलटायला आला असून, देखील आई घरी परत येत नसल्याने दोन्ही मुले दाराकडे टक लावून आईची प्रतिक्षा करत आहे. ए आई तू लवकर घरी परत ये…. मुले आकांताने आईला हाक देत आहे. आईच्या विरहाने कासावीस झालेल्या मुलांची अवस्था पाहून वडिलांना पाहवत नसल्याने ते वारंवार पोलीसांकडे तपासाबाबत विचारणा करत आहे. मात्र पोलीसांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने वडिल व मुलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे कविता शेळके यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.


मुलांनी देखील आईला परत घरी घेऊन येण्याची पोलीसांकडे मागणी केली. पत्नीचा तपास न लागल्यास मुलाबाळांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा हरवलेल्या महिलेचे पती अशोक शेळके यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *